चाकणला भापसेकडून स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी,.
बेघरांचे अबकड प्रपत्र तपासणीला वेग,.
चाकण : प्रतिनिधी
पारशी नूतन वर्षे अर्थात भारताचा स्वातंत्र्यदिन येत्या गुरुवारी ( दि. १५ ) संपूर्ण देशात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भापसे पार्टीनेही या स्वातंत्र्य दिनाची चाकण येथील केंद्रीय कार्यालयात जोरदार तयारी सुरु केली आहे.
भापसे पार्टीचे पक्षप्रमुख तथा पक्षाध्यक्ष दिपकभाऊ ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिनी दिवसभर भरगच्च अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पक्षप्रमुख दिपकभाऊ ताटे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. प्रारंभी भापसे पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्रीताई ताटे यांच्या हस्ते ध्वजपूजन होणार आहे. यावेळी भापसे पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गालफाडे, युवा नेते समाधान ताटे, जालिंदर उपाडे, शिल्पा शिंदे, अनिता ओव्हाळ, हिरा कदम, अंजली देशमुख, उषा जाधव, अनुसया भालेराव, शालन सोनवणे, शांता पखाले, संजीवनी महापुरे, राजेश पदमने, वसंत पखाले आदींसह हजारो बेघर नागरिक उपस्थित राहणार आहेत.